Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
मच्छीमार समाज करिता नवीन भूजल महामंडळ लवकरच स्थापन होणार
मुंबई, दिनांक ३० /०९/२०२४ रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी माननीय ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक तथा मस्य व्यवसाय यांच्या अध्यक्ष ते खाली मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, आयुक्त मत्सव्यवसाय डॉ. अतुलजी पाटणे, महाराष्ट्र राज्य, उपसचिव श्री.कि.म.जकाते, अँड. अमोल बावणे महाराष्ट्र राज्य मत्स्यउद्योग विकास धोरण समिती सदस्य, श्री अमितजी चावले प्रतिनिधी, श्री रमेश सोनवणे प्रतिनिधी, श्री, जितू टिंगूसले संस्थेची प्रतिनिधी.व इतर अधिकारी उपस्तिथ होते
माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षते खाली मत्स्य व्यवसाय सोसायटी व मासेमारी समाज यांच्या समस्या बाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली असून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार असून त्या बाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले आहे.
संस्थेला प्रति हेक्टरी १५०० किलो मत्स्य उत्पादन करणे गरजेचे ही अट रद्द करण्यात आली,
बिटूकली चे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्यात येणार या बाबात जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहे,
नायलॉन सूत जाळे, डोंगे यांचे अनुदान सभासद यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येहील,
मासेमारी संस्थेवर असणारे कर्ज माफी बाबत चा प्रस्थावा तयार करण्याचे सूचना देण्यात आल्या आहे.
जुलै २०२४ मध्ये ऑल दृष्टीमुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाई बाबत चर्चा करण्यात आली व तश्या सूचना सबंधित अधिकारी याना देण्यात आल्या .,
मासेमारी संस्था व समाज यांच्या इतर समश्या बाबत चर्चा करण्यात आली त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारा समाज असून त्यांच्या करिता स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार व
महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा समाज व संस्था हा भुजल जलाशयात मासेमारी करतात त्या करिता त्यांच्या विकासा च्या उद्देश्याने भूजल महामंडळ ची स्थापना करण्यात येणार आहेत. अँड. अमोल बावणे मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य. व प्रतिनिधी यांनी बैठकीमध्ये भुजल महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली असून महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्यालय नागपूर येथे घेण्यात यावे, सर्वाधिक भुजल संस्था ह्या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपूर या ठिकाणी घेण्यात येणार अशी मागणी मान्य केली आहे,
भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार, त्या करिता. माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी करणाऱ्या नदी नाल्यातील समाज व मत्स्य सोसायटी यांच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक, व्यवसायिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा माननीय मंत्री महोदयाचा उद्देश आहेत, त्याकरिता अँड. अमोल बावणे महामंडळ कार्य प्रणाली साठी वेळो वेळी सूचना व माहिती पुरवावी व अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना वर अंमलबजावणी करावी असा आदेश मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला.
या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील सर्व मासेमारी समाज यांच्यामध्ये आनंदाची वार्ता पसरली असून मासेमारी समाजाकडून माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक व स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे व मासेमारी समाजामध्ये आनंदाची दिवाळी साजरी होत आहे.
भूजल महामंडळाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी होणार
अँड.अमोल बावणे यांच्या प्रयत्नांना यश
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा