Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ जून, २०२५

पत्रकार समाधन मैराळे यांना मानद डॉक्टरेड पदवी प्रदान.




अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण्यात आली. मॅजिक आणि आर्ट विद्यापीठ हरियाणा या विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मानद डॉक्टरेड पदवीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार पात्रतेत बसणाऱ्या विविध राज्यातील लोकांची निवड झाली होती तर त्यातून महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील समाधान एकनाथ मैराळे यांचीही निवड झाली होती. निवड झाल्यानंतर दिनांक १४ जून रोजी दिल्ली येथे संपूर्ण भारतातील सुमारे ३८ जणांना मानद डॉक्टरेड पदवीने सन्मानित करण्यात आले. ही पदवी सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ राम अवतार शर्मा, दिल्ली पोलिसातील पोलीस अधिकारी किरण सेठी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
दरम्यान समाधान मैराळे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेड पदवी बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध