Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर येथे 24 वर्षांची परंपरा असलेल्या महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळातर्फे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन




शिरपूर - शहरातील 24 वर्षांची परंपरा असलेल्या माळी गल्ली येथील महात्मा ज्योतिबा फुले नवयुवक मित्र मंडळातर्फे दसऱ्याच्या दिवशी श्री खंडेराव मंदिराजवळील अरुणावती नदीच्या पात्रात शनी मंदिर समोर चाळीस फूट उंच रावण दहनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता रावण दहन कार्यक्रम संपन्न होत असून त्याआधी राम लक्ष्मण हनुमान वानरसेना यांची मिरवणूक दुपारी 4.30 वाजता माळी गल्लीतून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत माळी समाजाचे लेझीम पथक,, बँड पथक, ढोल ताशे यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येईल.

40 फूट उंच असलेल्या या रावणाच्या प्रतिकृतीचे संगमनेर येथील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. रावणाचा चेहरा शिरपूर येथील श्री शेलकर सर यांनी तयार केला आहे.

रावण दहन कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, बाबूलाल भिका महाजन, साहेबराव भिका महाजन यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.

रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नामदेव माळी, उपाध्यक्ष प्रमोद शांताराम माळी, सचिव चंद्रकांत वसंत माळी, कोषाध्यक्ष गजानन रतिलाल माळी, सहकोषाध्यक्ष संजय साखरलाल माळी, कार्याध्यक्ष अनिल सिताराम माळी, सहकार्याध्यक्ष रवींद्र मोहन माळी, कार्यकारिणी सदस्य सुरेश जगन्नाथ माळी, प्रेमराज विठ्ठल माळी, सुरेश मेघराज माळी, संतोष रूपचंद माळी, हिम्मत शामराव माळी, जितेंद्र गंगाधर माळी, कंचन मोतीलाल माळी, संजय बाबूलाल माळी, गोपाल मुरलीधर माळी, रवींद्र सुकलाल माळी आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध