Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

हिंदूंच्या भावना दुखावणारे सोशल मीडियात प्रसारित होणाऱ्या संदेशांवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक




शिरपूर (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकी दरम्यान आता सोशल मीडियात प्रसारित होणाऱ्या संदेशांवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत शिरपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी सोशल मीडियात व्हाट्सअप संदेश यामार्फत उमेदवार व विरोधक यांना राम-रावणाचे उपमा दिली आहे यात तसे व्हिडिओ पोस्ट बनवून हिंदूंच्या भावना दुखावणारे संदेश प्रसारित केले असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटले आहे या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी शिरपूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले आहे सदर हिंदुत्व आणि संघटनेत राष्ट्रीय बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांचा समावेश आहे हिंदू धर्माचा आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाचे अक्षेपार्ह संदेश हिंदुत्ववादी संघटना कधीही सहन करणार नाही राजकारणी वैयक्तिक द्वेषापोटी एकमेकांचा विरोध दर्शवण्यासाठी हिंदू देवदेवतांचा प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करीत आहेत तसेच हिंदू देवदेवतांचा मुखवटा लावून देवांची बदनामी करून धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे याप्रकरणी सदर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध