Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

शिरपुरमध्ये पुर्व पट्ट्यात भाजपची विजय संकल्प यात्रे द्वारे प्रचाराचा झंझावात



शिरपूर(प्रतिनिधी)
शिरपूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून आज भाजपा, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भुपेशभाई पटेल व काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदार संघातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावात विजय संकल्प यात्राद्वारे प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती.त्या प्रचार रॅलीना मतदारांनी व ग्रामस्थांनी पाठिंबा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .आता मतदारसंघातील पूर्व भागात महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांचा विजय संकल्प रॅलीद्वारे प्रचाराचा झंझावात सुरू होणार असून त्यात आज १२ ऑक्टोबर रोजी सकाळी अमोदे येथे ७:३० वाजता, अजंदे येथे ९:०० वाजता, दहीवद १०:१५, तांडे येथे १२:०० वाजता तर १२:३० वाजता असली,व २:३० वाजता भोरखेडा व गोदी,तसेच ४:०० वाजता सावेर येथे, ५:०० अजनाड, ५:३० भबळाज येथे, तर ७:०० वाजता तरडी, ८:०० हिसाळे व शेवटची रॅली रात्री तोंदे येथे ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे.प्रचारनिमित्ताने सुरू असलेल्या रॅलीना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या सुरू असलेल्या प्रचाररॅलीना मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा,शिरपूर वरवाडे नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.तसेच प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनाचे सदस्य व महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध