Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

कि.वि.प्र.संस्थेच्या डॉ. पां.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांची शासकीय विभागस्तरीय ज्यूदो स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड




शिरपूर :प्रतिनिधी:कि.वि.प्र.संस्थेच्या डॉ. 
पां.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडू  विद्यार्थ्यांची शासकीय विभागस्तरीय ज्यूदो स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड नुकत्याच दिनांक 04/10/19 रोजी धुळे येथे आयोजित शासकीय विभागीय ज्यूदो क्रीडा स्पर्धेत किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.पा.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयातील मुले 19 वर्षे वयोगटात 73 ते 81 वजन गटात अक्षय भटू माळी या विद्यार्थ्यांने यशस्वी कामगिरी केली. सदर यशस्वी विद्यार्थी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्यूदो  स्पर्धेत नाशिक 

विभागाचे नेतृत्व करणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषारजी रंधे,सचिव नानासाहेब निशांतजी रंधे,खजिनदार आशाताई रंधे, विद्यार्थ्यांचे पालक श्री.भाऊसो भटू माळी,आबासो राहुल रंधे नगरसेवक रोहितबाबा रंधे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एन.पटेल उपप्राचार्य प्रा.ए.एस.मराठे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांस पुढील राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.एल.के. प्रताळे,क्रीडा शिक्षक श्री.राधेश्याम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध