Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या येथील पाडुरंग महाराजाचा रथोत्सव आज एकादशी निमित्य ९ रोजी उत्सवात साजरा करण्यात आला .






प्रतिंनिधी बहाळ / हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या येथील पाडुरंग महाराजाचा रथोत्सव आज एकादशी निमित्य ९ रोजी  उत्सवात साजरा करण्यात आला  . महाराष्ट्रत पंढरपूर आणि बहाळ येथे पाडुरंगाचा रथोउत्सव साजरा करण्यात येतो येथील रथ उत्सवाला 186 वर्षाची परंपरा आहे .  
 
येथील रथोत्सवाला 1833 पासून सुरुवात झाली असून अखंड सुरू आहे दसर्‍या नंतर येणार्‍या एकादशीला रथोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .रथोत्सवात जिल्याभारातून भाविकांची उपस्थिति होते .भाविक या रथोत्सवात मोठ्या श्रध्देने सहभागी झाले होते. दुपारीपाच वाजता  रथावर विठ्ठलाची मूर्ति विराजमान करण्यात आली त्यानंतर रथाची मंदिरापासून रथाची मिरवणूक  टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली .

दोराच्या साहय्याने रथ ओढण्यात आला . रथावर द्दोघी बाजूला भालदार ,चोपदर घोड्यांना हाकणारा सारथी असा देखावा सादर करण्यात आला . प्रसाद म्हणून केळीचे वाटप करण्यात आला . संपूर्ण रथाला आकर्षक  फुलांनी व फळांनी , विदधूत रोषणाईने सजविले  आले होते. मेनरोड ,सावता महाराज चौक ,जगणाडे महाराज चौक ,सुतार गल्ली मार्गे रथाला सायंकाळी साडे सात वाजे पर्येंत वाणी मगलकार्यालया पर्येंत पोहचविला  . रथाच्या पूजेचा मान पाडुरंग महाराजचे व्ंशज बाळकृष्ण  ब्राम्हंनकर   व वासुदेव ब्राम्हंनकार   सरपंच वैशाली पवार यांच्या हस्ते  करण्यात येईल. रथाच्या देखरेखीचे काम ग्रामपंचायत  व सारजा  बारजा माता व विठ्ठल मदिर समिति कडे असते .पुरातन काळातिल संपूर्ण सागवण लाकडा पासून तयार करण्यात आलेल्या रथावर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे त्यावर अप्रतिम कोरीव काम आहे रथाची ऊंची 30 ते 35 फुट आहे रथावर दशावताराच्या मुर्तावर सुरेख कोरीवपाडूरंग महाराजाचा जयघोष दुमदुमली बहाळ नागरी , कुस्त्यांची दंगल, 1833 पासून रथ उत्सवाला सुरुवात  काम केलेले आहे मोगर्‍या लावण्याचा मान सुरेश माहरू सुतार ,योगेश वाल्मिक सुतार , युवराज सुतार, योगेश सुतार ,यांनी मोगर्‍या लावल्या .  मेहुणबारे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला . रथोत्सवा निमित्य रविवारी दि १०रोजी कुस्त्यांची दगलीचे आयोजन करण्यात आली आहे .यावेळी मेहुणबारे ए पी आय सचिन बेंद्रे  psi हेमंत शिदे  पोलिस कान्स्टेबल गोपाल पाटील रवी पाटील मांनीच्छंदी मथुरे यांनी कडक बंदोबस्त ठेवला साईपंच वैशाली उपसरपच राजेद् माळी, व सर्व ग्रामपंचायेत सद्शय   माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे सह भाविक यांच्या भाविक मोठ्या सख्ने उपस्थित होते.

संदया विधान सभेची निवडणूक चालू असून अपक्ष उमेदवार विनोद कोतकर , राजीव देशमुख मंगेश चव्हाण या उमेदवारांनी पाडुरंगाला निवडून येण्यासाठी साखळे घातले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध