Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी शिरपूर येथे विजय संकल्प सभा, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा होणार भाजप मध्ये जाहीर प्रवेश,






शिरपूर - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे बुधवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विजय संकल्प सभा होणार असून यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा प्रवेश  होणार आहे. 

भाजपा, शिवसेना, आर. पी. आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि.०९/१०/२०१९ बुधवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा व तालुक्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा मध्ये जाहीर प्रवेश होईल.

शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदानावर सकाळी ११ वाजता सभा होईल.

सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष राहुल रंधे, भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हिम्मतराव महाजन, शिवसेना तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख मनोज धनगर, आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष रमेश सैंदाणे, महायुती चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध