Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

शिरपूर येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या शिरपूर येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या


शिरपूर:प्रतिनिधी: येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या शमुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरजवळ टोलनाक्याला गत आढे फाट्यावरील बस स्थानकावर आज बुधवारी दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

सुरेश भिमराज धाकड वय ७३ रा.शिरपूर धाकड गल्ली असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शिव बाबा आयुर्वेदिक औषधे दुकानाचे मालक होते. मृत्यू पूर्वी त्यानी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मी माझ्या जीवास कंटाळून आत्महत्या करीत आहे तरी यास कुणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे.घटनास्थळी थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे पोहचले आहेत. पुढील कार्यवाही थाळनेर पोलीस करीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध