Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पाच लाखाची रोकड जप्त,चर्चेला उधाण




शिरपूर(प्रतिनिधी )विधान सभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची तपासणी करीत असताना एक वाहनात तपासणी करतांना पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली.त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशाने शिरपूर विधानसभा मतदारसंघात अवैध दारू,शस्र व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी तालुक्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दि.११ऑक्टोबर रोजी रात्रीच्या ११ वाजेच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्यावर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील,पीएसआय खैरनार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बाविस्कर,लक्ष्मण गवळी,संजय देवरे,राजेंद्र मांडगे, योगेश दाभाडे,हे रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत असताना कार क्रं. एमएच-१८-९०९९ ची तपासणी करतांना कारमध्ये ५००/-रुपये किमतीच्या ८०० चलनी नोटा एकूण ४ लाख व २००/-किमतीच्या ५०० चलनी नोटा १ लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपयांची रोकड मिळून आली. याप्रकरणी वाहन चालक युवराज अरविंद शिंदे रा.कॉटन मार्केट मागे धुळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर रक्कम ही व्यावसायिक असल्याचे प्रथमदर्शनी चौकशी वरून दिसून येत असल्याने अधिक चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने जनतेमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध