Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

तालुक्यातील जनतेला वचन देणारे आता जनतेकडे दुर्लक्ष करत आहेत.:- डॉ जितेंद्र ठाकूर





शिरपूर:प्रतिनिधी: लोकांच्या कल्याणासाठी नेहमी कर्तव्यदक्ष असतो. मि व्यक्ती विरोधात नसुन प्रव्रुत्ती विरूध्दात आहे.तालुक्यातील प्राणवायू सहकार उद्योग बंद आहे.जनतेला वचन देणारी मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले. जनाशिर्वाद दौऱ्यादरम्यान दहिवद येथील सभेत डॉ जितेंद्र ठाकूर बोलत होते.

दि ११ रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांची जनाशिर्वाद दौऱ्यादरम्यान दहिवद येथे सभा घेण्यात आली होती.सभेत मिलींद पाटील यांनी अपक्ष लढाई लढत असल्याने कशा प्रकारे दबावतंत्र वापरण्यात आला याबाबत भांडाफोड केला.यानंतर अमित जैन  सभेत बोलतांना म्हणाले तालुक्यातील बंद साखर कारखान्यावर गलिच्छ राजकारण करणाऱ्यांंना सरळ प्रश्न विचारा कारखाना बंद पाडण्यास कोण कारणीभूत आहेत.एकाच रात्रीत पक्ष परिवर्तन होत नाहीत यामागे मोठे पार्शवभुमी आहे.सर्व चौकशी सुरु झाली असल्याने पितळ उघड पडणार असल्याने पक्ष प्रवेश केला असल्याचा आरोप अमित जैन यांनी केला.सभेत ओंकार जाधव व नगरसेवक चंदनसिंग राजपूत यांनी देखील संबोधीत केले.यानंतर डॉ जितेंद्र ठाकूर बोलतांना म्हणाले की,तालुक्यातील लोकांच्या कल्याणासाठी नेहमी कर्तव्यदक्ष असतो.मि व्यक्ती विरोधात नसुन घाणेरड्या राजकारणा विरूध्दात आहे.तालुक्यातील प्राणवायू सहकार उद्योग बंद आहे.बंद प्रकल्प चालू करण्याचे वचन देणारी मंडळींनी जनतेची दिशाभूल केली.शेवट पर्यंत सांगण्यात आले होते की डॉ जितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र षडयंत्र रचुन मला डावलण्यात आले.मात्र जनतेच्या मागणीनुसार अपक्ष लढा देत असुन तालुक्यात होणारी हुकूमशाही मिटवण्यासाठी हा अपक्ष लढा देत आहे.जातीपातीचे राजकारण न करता तालुक्यातील जनतेच्या हितासाठी अपक्ष लढत असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर हे बोलतांना म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर राजपूत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध