श्री.ईश्वर महाजन सर


अमळनेर प्रतिनिधी- 
अमळनेर येथील दैनिक साईमतचे तालुका प्रतिनिधी ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांचे लेखनाबद्दल नुकताच देशातील नामांकित संस्थेच्या वतीने  वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड 2019 साठी नुकतीच निवड झाली व त्या निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी पत्र पाठवले. 
समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाप्रती असलेली निष्ठा
जपण्याच्या हेतूने सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना सन्मानीत करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात
या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे "
वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड " देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने आपल्याला २३ डिसेंबर २०१९ रोजी श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथे सकाळी १० वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून आपला सन्मान WCPA चे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
त्यांचे अभिनंदन अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव यांनी केले.