Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

अमरीशभाई पटेल खरे विकासपुरुष,आता त्यांच्या विकास कामांना भाजपचे डबल इंजिन लावू:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रभावी नेते, पाणी, शिक्षण, उद्योग सर्वच क्षेत्रात प्रभावी व अभूतपूर्व काम केलेले तसेच लोहपुरुष सरदार पटेल यांच्या घराण्यातील प्रभावी व्यक्तिमत्त्व अमरिशभाई पटेल यांचा भाजप मध्ये प्रवेश झाल्याने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर देशवासीय खूश आहेत. अमरिशभाई भाजपामध्ये यावेत अशी आमची अनेक वर्षांपासूनची मनापासून इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. त्यांनी केलेले शिरपूर पॅटर्नचे काम सर्वांना दिशा देणारे आहे. त्यांच्या शिरपूर पॅटर्नमुळेच्या धर्तीवर दुष्काळ मुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना आम्ही शासनामार्फत सुरू केली. अमरिशभाई पटेल यांनी आधीच तालुक्यात खूच काम केले आहे. ते खरे विकासपुरुष आहेत. आज त्यांच्यासह अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अमरिशभाई तुम्ही स्वतःच्या भरवशावर अनेक वर्षे विकास केला. आता तुमच्या विकासकामांना भाजप चे डबल इंजिन लावू. दोनच वर्षात शिरपूर तालुक्याच्या सर्व मागण्या पूर्ण करू. कालचे व उद्या चे आमदार काशिराम पावरा यांना भरघोस मतांनी निवडून दयायचे आहे. महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळणार आहे. महारार्ष्ट शासनाने गोरगरीब, अल्पसंख्याक, सर्वांचे मनापासून काम केले. शेतकरी व सर्वांना न्याय दिला. कर्जमाफीच्या माध्यमातून मदत केली. आदिवासी बांधवांना मदत केली. दुष्काळ परिस्थितीत मदत केली. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. शेततळे, विहिरी व अनेक सुविधांमधून शेतकरी बांधवांना मदत केली. खान्देशातील अनेक प्रकल्पांना निधी दिला. हजारो कोटींचे रस्ते, महामार्ग केले. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग काम सुरू आहे. पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणतात जात पाहू नका, धर्म पाहू नका, सर्वांसाठी काम करा. हजारोंच्या संख्येने घरकुल निर्मिती केली. अतिक्रमणे नियमित करून कामे केली. झोपडपट्टींचे रुपांतर चांगल्या घरात केले. अमरिशभाईं मुळे शिरपूर हे शिक्षणाचे माहेरघर झाले. यापुढे अजूल विकास करणार. शिक्षणाबाबत महाराष्ट्र देशात तिसरा क्रमांकावर असून यापुढे पहिल्या क्रमांकावर राहिल. राज्यात सर्वत्र डिजिटल तंत्रज्ञान दिले. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री आरोग्य सेवा योजनेतून दुर्धर आजाराने ४१ लाख रुग्णांचे मोफत ऑपरेशन केले. देशात सर्वात जास्त रोजगार महाराष्ट्रात निर्माण केला. प्रत्येक युवकाच्या हाताला काम व शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळेल असे काम करणार. मोदी व अमित शाह यांनी काश्मीर मधील देशाचे भारत व जम्मू काश्मीर यांचे विभाजन करणारे ३७० कलम हटवले. त्यामुळे अखंड भारत निर्माण केला.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश समृद्ध होत आहे. जयकुमार रावल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. शिरपूर येथे भाजप चा उमेदवाराने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळविला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजता भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांचा विजय संकल्प सभा संपन्न झाली. यावेळी माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी अध्यक्षा संगिता देसले, राजेंद्र देसले तसेच तालुक्यातील १० हजार पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, आर.पी.आय., महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदानावर सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल, खा. हिनाताई गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, उमेदवार काशिराम पावरा, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महापौर चंद्रकांत सोनार, मोहन पाटील, कि.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, ॲड. ललिता पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, अतुल सोनवणे, दिलीप लोहार, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हिम्मतराव महाजन, राजू टेलर, शिवसेना तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्ष रमेश सैंदाणे, रमेश वसावे, अमृता महाजन, अरुण धोबी, संजय आसापुरे, महायुती चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध