Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

दरोड्यांचा तयारीत असलेले एलसीबीच्या जाळ्यात,गावठी पिस्तूलसहित मुद्देमाल जप्त


शिरपूर (प्रतिनिधी)मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने 9 ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंटवर वाहनांची तपासणी करीत असताना महामार्गावर नीला हॉटेलसमोरून सेंधव्याकडे भरधाव जाणाऱ्या मारुती इको व्हॅनचा तपासणी पथकाला संशय आला. संशयावरून निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनिल पाटील, हवलदार सुनील विंचुरकर, संदीप थोरात, प्रभाकर बैसाने, मनोज पाटील, चेतन कंखरे, योगेश जगताप, केतन पाटील, महेश मराठे यांनी मारुती व्हॅनचा पाठलाग करीत दहिवद फाट्यावर व्हॅन क्रं.एमपी 09 डब्ल्यूबी 4098 थांबवण्यात पोलिसांना यश आले. वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी व्हॅनची झडती घेतल्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, मिरची पावडर व नायलॉनचा दोर असा मुद्देमाल आढळला. व्हॅनमधील संशयित चेतन किशोर धामणे, सिद्धार्थ राजेश धामणे, रोहित किशोर धामणे सर्व रा. सेंधवा, सजन बगड्या डावर रा. जामली ता. सेंधवा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक संशयित नरेश बाटा मात्र फरार झाला. शिरपूर पोलिसात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित १८ ते २२ वयोगटातील आहेत. ते दरोड्याच्या उद्देशाने महामार्गावर टेहळणी करीत असल्याचा संशय आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध