Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार




शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यात प्रथमच विधानसभेच्या रणधुमाळीत बहुजन आघाडी नाही आपला उमेदवार उभा केला आहे. यासाठी प्राध्यापक मोतीलाल सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्राध्यापक सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला परिचय करून दिला शिवाय आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे काय असतील याबाबत माहिती दिली. अध्यापक मोतीलाल सोनवणे हे व्यवसायाने प्राध्यापक असून सामाजिक स्तरावर काम करताना त्यांनी पत्रकार, उपसंपादक, संचालक, विविध संघटनांचे अध्यक्ष, सदस्य, निरीक्षक, लेखक, सल्लागार, संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशा अनेक प्रकारच्या पदे त्यांनी उपभोगले असून समाजाभिमुख काम करण्याचे त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. यात प्रामुख्याने साहित्य पुरस्कार, शेतकरी मित्र पुरस्कार, आदर्श समाजसेवक पुरस्कार, सेव्हन स्टार पुरस्कार, आदिवासी कोळी भूषण पुरस्कार, कला गौरव पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे एका उच्च शिक्षित उमेदवाराची उमेदवारी वंचित बहुजन आघाडी नाही शिरपूर तालुक्यासाठी दिली आहे आणि तालुक्यातील जनतेने मला निवडून दिले तर मी गरीब आदिवासी दलित लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय समाजातील अन्य घटक, व्यापारी आणि श्रीमंत इत्यादी लोकांसाठी देखील आपण सर्व समाजाचे लोकांना सोबत घेऊन सर्व समावेशक भूमिका घेऊन जनकल्याणासाठी काम करणार असल्याचे मग त्यांनी बोलून दाखवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध