Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर शहरात लाखोंची बेकायदेशीर देशी विदेशी दारू जप्त,एकास अटक




शिरपूर:प्रतिनिधी:शहरात लाखोंची बेकायदेशीर देशी विदेशी दारू जप्त,एकास अटक दारू विक्री करणाऱ्यावर छापा टाकून लाखोंची ददेशी विदेशी दारू जप्त केली.व एकास अटक करण्यात आली आहे. दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री च्या सुमारास शहरातील करवंद रोडवर फार्मर्सी कॉलेज समोर झाडाझुडपात सार्वजनिक जागेवर एक इसम बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारूचे बॉक्स विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार पोकॉ नरेंद्र शिंदे,उमेश पाटील, योगेश कोळी,स्वप्नील बांगर, विशाल लोंढे, प्रवीण गोसावी व वाहन चालक पोकॉ हरून शेख यांनी सदर जागेवर रात्री ८:१५ वाजता छापा टाकला असता एक संशयित इसमसह ४७ हजार ४२४ रुपये किमतीची टॅगो पंच कंपनीचे १९ बॉक्स,४७ हजार ४० रु. किमतीची आयबी कंपनीचे ७ बॉक्स,३० हजार ७८० रु. किमतीची आयबी कंपनीचे ३ बॉक्समध्ये रॉयल टॅग, ३ हजार ७८० रू.किमतीची १८० मिलीं च्या २७ बाटल्या मास्टर ब्लेंड असे एकूण १ लाख २९ हजार २४ रुपये किमतीची बेकायदेशीर देशी विदेशी दारू मिळून आली असून सदर मुद्देमाल व एकास ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पोकॉ नरेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून अनिल उर्फ गोविंदा गुलाब खैरनार वय ३५ रा.खालचे गावं, बौद्ध वाडा, शिरपूर याच्या विरोधात गुरनं २९/२०१९ नुसार मुं.प्रो.का.क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व शिरपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध