Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर तालुक्यात बनावट गावठी पिस्टल सहित सराईत गुन्हेगार ताब्यात,सांगवी पोलीसांची कार्यवाही





शिरपूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमावर्ती भागातून बनावटी गावठी पिस्तुल घेऊन शिरपूर च्या दिशेने जाणाऱ्या एकाला सापळा रचून बनावटी गावठी पिस्तुल सहित संशयित सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशाने शिरपूर विधानसभा मतदारसंघात अवैध दारू,शस्र व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी तालुक्याच्या सीमेवर पोलीस सतर्क असून तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या एका गुप्त माहितीवरून दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास वडेल जवळ वरला कडून शिरपूरकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप क्रं. एमपी-१०सीए-०१२६ तपासणी दरम्यान संशयित गणेश सुकलाल पाटील रा.सेंधवा जि. बडवाणी याच्या कमरेस १२ हजार रुपये किमतीचे बनावटी गावठी पिस्तुल मॅगझीन सह व ४००/- किमतीचे पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडतुस मिळून आले.असे एकूण १२४००/- किमतीचा मुद्देमाल व संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे याप्रकरणी पोहेकॉ लक्ष्मण गवळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गणेश सुकलाल पाटील यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.संशयितास दि.१३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली.पुढील तपास पीएसआय खैरनार हे करीत आहेत.तालुका पोलीसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश सुकलाल पाटील याच्याविरोधात मध्यप्रदेश राज्यात भारतीय हत्यार कायदासहित विविध गंभीर कलमानव्ये सुमारे ६ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले असून संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.तालुका पोलीसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश सुकलाल पाटील याच्याविरोधात मध्यप्रदेश राज्यात भारतीय हत्यार कायदासहित विविध गंभीर कलमानव्ये सुमारे ६ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले असून संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे,शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील,पीएसआय खैरनार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बाविस्कर,पोहेकॉ लक्ष्मण गवळी, संजय जाधव,महेंद्र वानखेडे, जगन गावित, देवरे,योगेश दाभाडे,गोविंद कोळी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध