Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

डाॅ. जितेंद्र ठाकुर, सौ. मंजुळा गावीत यांचा भाजपाचा राजीनामा मंजुर




शिरपुर (प्रतिनिधी) धुळे जिल्हातील
भारतीय जनता पार्टीचे दोन बंडोखोरांचा राजीनामा मंजुर करण्यात आला. असुन शिरपुर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान पावरा व साक्री विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार मोहन गोकुळ सुर्यवंशी यांचा विरोधात पक्षाचे बंडोखोर उमेदवार डाॅ. जितेंद्र युवराज ठाकुर व सौ. मंजुळा तुळशीराम गावीत यांनी उमेदवारी करण्या आधी पक्षाचा दिलेला राजीनामा मंजुर करण्यात आला आहे. डाॅ. जितेंद्र ठाकुर व सौ. मंजुळा गावीत यांचा  पक्षाशी आता कुठलाही संबंध नाही तरी शिरपुर व साक्री मधील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डाॅ. जितेंद्र ठाकुर व सौ. मंजुळा गावीत यांचा प्रचारात भाग घेवुन मदत केल्यास त्यांचावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येवुन पक्षातुन हाकलपट्टी करण्यात येईल. असे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध