Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

चोपडा शेतकी संघात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी !!





प्रतिनिधी चोपडा विनोद निकम :
देशाचे माजी गृहमंत्री आणि अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना आज सकाळी अकरा वाजता चोपडा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघात जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी चेअरमन चंद्रशेखर भीमराव पाटील,शेतकी संघाचे संचालक व नगरसेवक  हितेंद्र देशमुख (राजु भाऊ)दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्थ प्रवीण पाटील,मॅनेजर राहुल पाटील,संजय कोळी,बाबूलाल शिंपी,सुधाकर चौधरी,भिका पाटील,सुभाष पाटील,अमोल पाटील हजर होते.
यावेळी चेअरमन चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की सरदार पटेल याचे कार्य देश कदापि विसरता येणार नाही.देश अखंड ठेवण्यासाठी सरदार पटेलांना आपलं जीवन व्यथित केले होते.आज त्याच्या अखंडतेचा शिकवणी वर चालण्याची गरज असून जात पात विसरून सर्व समाज एकत्रित राहिला तर देश महासत्ता होण्यासाठी मदत होणार आहे.आणि देश महासत्ता झाल्यास खरी श्रद्धांजली ठरेल असेही चेअरमन चंद्रशेखर पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध