Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाजप, महायुतीची विजय संकल्प यात्रा, मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा


शिरपूर(प्रतिनिधी)
शिरपूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महायुतीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांचा प्रचार रॅली सुरू आहेत. त्याअंतर्गत मतदार संघातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावात विजय संकल्प यात्राद्वारे प्रचार रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
 त्याअंतर्गत आज  दि.१०ऑक्टोबर रोजी भामपूर, लोंढरे, वरूळ, जवखेडा, अंतुर्ली,तऱ्हाड कसबे या तालुक्याच्या पश्चिम भागातील गावात भाजपा, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. रॅलीत मतदारांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
उद्या  दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळपासून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावात विजय संकल्प यात्राद्वारे प्रचार रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. यात आज ११ ऑक्टोबर रोजी सकाळी चांदपुरी येथे ७:३० वाजता, भरवाडे येथे ९:०० वाजता,टेंभे १०:३०,टेकवाडे येथे११:३० वाजता तर १ वाजता खामखेडा,४:०० वाजता तऱ्हाडी,६:०० वाजता अभानपुर येथे तर शेवटची रॅली सायंकाळी जळोद येथे ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या या सुरू असलेल्या प्रचारसभांना मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार काशीराम पावरासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.तसेच प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनाचे सदस्य व महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध