खान्देशात अमळनेरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेत विराट जनसागर .
BY ऑनलाईन तरुण गर्जना
१० ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)
अमळनेरच्या
जाहीर सभेत असलेल्या विराट समुहाने भारतीय
जनता पार्टीवाले हार्ट अटॅकनेच खल्लास
होणार..अमोल मिटकर
भूमिपुत्रासाठी
एकवटला तालुका आतापर्यंत विधानसभेच्या झालेल्या जाहीर सभा मधिल रेकॉर्ड ब्रेक
गर्दी .
अमळनेरच्या
जनतेने भूमिपुत्राच्या जाहीर सभेत उपस्थित राहून दिला विजयाचा संकेत.
उत्तर खान्देश वर झालेला अन्याय हा आता तालुक्यातील जनतेच्या डोक्यात गेला
असून त्याची प्रचिती आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांच्या
जाहीर प्रचार सभेत पाहायला मिळाली .तालुक्यातील भूमिपुत्रासाठी लोकांनी वज्रमुठ धारण केलेली
असल्याचे चित्र आज दिसून आले . ना
भूतो ना भविष्य असा विराट जनसमुदाय आजपर्यंत कधीही जमलेला नसल्याचे प्रत्येक
नागरिकाच्या मुखी होते.विराट जनसमुहाने आजूबाजूला असलेल्या सर्व जागेवर आपला ताबा घेतला होता .
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकर यांनी पाडळसरे
धरणाच्या मुद्यावर हात घालत सत्ताधारी पक्षाचे गल्ली ते दिल्ली सरकार व जिल्ह्यात
जलसंपदा मंत्री असतांना देखिल धरणाचे काम
एक इंच होवू शकले नाही .
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कर्ज माफी झाल्या आहेत .त्यात पहिली कर्ज माफी
राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी केली दुसरी कर्जमाफी छत्रपती शिवाजी
महाराज यांनी व तिसरी सरसकट कर्ज माफी आदरणीय शरद पवार यांनी २००८ साली
केली .आताच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा सहारा घेत फसवी कर्ज माफी केली
असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात कुठलीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.
२०१९ च्या विधानसभेत एकनाथराव खडसे यांचा पत्ता कट करत त्यांनी त्यांचे
मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले आहे .परिणामी त्यांनी खान्देशवर अन्याय करत
या मायभूमीचा मुख्यमंत्री नाकारला असून त्याचा बदला जिल्ह्यातील जनता सर्व भारतीय जनता
पार्टीचे उमेदवार पराभूत करून घेईल असा विश्वास मला आहे.या निवडणुकीत आमचे शंभर पेक्षा
जास्त उमेदवार निवडून येतील व सत्तेत आल्यावर आम्ही अजित पवार साहेब यांच्या
शब्दाला जागत तीन महीन्याच्या आत सातबारा कोरा करू असा शब्द दिला .

जिल्ह्यातील संकटमोचन गिरीश महाजन यांनीच जिल्ह्याला संकटात टाकले आहे
.जिल्ह्याच्या विकासापेक्षा त्यांनी या पाच वर्षात पक्ष वाढवण्याचे काम केले .मुख्यमंत्री
यांच्या नजरेत स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या, जनतेच्या समस्यांकडे
दुर्लक्ष करत सतेच्या नशेत धुंद राहिले . शेतकरी मायबाप हा या देशाचा अन्नदाता असतांना त्यांना धक्का
बुकी करण्याचे महापाप सत्ताधारीनी केले.सत्तेचा माज या सरकारला आला असून गिरीश
भाऊ दारूच्या बाटलीला महिलेचे नांव द्यायला सांगतात तर दानवे
शेतकऱ्यांना साला म्हणतात . पाडळसरे धरण समितीच्या व्यासपीठावर यांनी
धरणाचे काम तीन महिन्यात सुरु करू असे आश्वासन अमळनेरच्या जनतेला दिले होते . आज १७
महिने झाले तरी यांनी धरणाचे एक इंच देखिल काम केले नाही.जिल्ह्यातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथराव
खडसे व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे भूमिपुत्र जिल्हाध्यक्ष उदय वाघ ,
स्मिता वाघ यांचे राजकीय पत्ता कट
करत भूमिपुत्रांचे राजकारण संपवण्याचे काम
यांच्याकडून सुरु आहे.अमळनेरची जनता हे सर्व जाणून आहे व यावेळेस आपल मत भुमिपुत्राला हाच
त्यांचा संकल्प आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने देणाऱ्या भाड्यानो ..”उघडा डोळे
बघा नीट” आज अमळनेर मधिल ही जनता शरद
पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रासाठी जमलेली आहे .विराट जनसागर हा पैसे
देवून आणलेला नसून अमळनेरच्या स्वाभिमानासाठी जमलेला आहे .
अमळनेरच्या स्वाभिमानासाठी जमलेला विराट जनसमूह निश्चितच अमळनेरला लागलेला
कलंक मिटवणार व अनिल दादा यांना विराट मतांच्या फरकाने विजयी करणार असा
आत्मविश्वास मला आहे असेही मिटकर म्हटले .
राष्ट्रवादी कांग्रेस
पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांनी विराट जनसमुहाच्या भावनेला हाक घालत जर विध्यमान आमदार
यांनी पाच वर्षात पाडळसरे धरणाचे काम एक इंच देखिल केले असते तर मी स्वतः त्यांना
जाहीर पाठिंबा दिला असता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा