Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

शिरपूरमध्ये पावरा व डॉ.ठाकूर यांच्यात आव्हानाचा सामना






विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ.ठाकूर यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढवतांना डॉ.ठाकूर यांनी ७३ हजार मते मिळवली होती. यंदाही त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसचे विद्यमान आमदार कांशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ माजी शिक्षण मंत्री अमरिषभाई पटेल यांनीही विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचा भाजप प्रवेशही निश्चित मानला जात आहे. भाजपने कांशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर केल्याने आपल्यावर अन्याय झाल्याच्या मुद्द्यावर डॉ.ठाकूर यांनी अर्ज भरला. मुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांनी मनधरणी करूनही डॉ.ठाकूर यांनी अर्ज कायम ठेवला. मतदारसंघाच्या इतिहासात भाजपमध्ये झालेली ही पहिलीच बंडाळी आहे. दरम्यान आज (ता.७) माघारीच्या अंतिम दिवशी बहुजन मुक्ती मोर्चाचे इच्छुक पांडुरंग भिल यांनी माघार घेतली.

 रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे पक्ष असे,

कांशीराम पावरा-भाजप,

रणजितसिंह पावरा-काँग्रेस,

 विकास सैंदाणे-भाकप,

 सुक्राम पावरा-बसप,

 किशोर भिल-मानव एकता पार्टी,

 मोतीलाल सोनवणे-वंचित बहुजन आघाडी,
 
डॉ.जितेंद्र ठाकूर-अपक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध