Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

अमळनेर मध्ये सत्तेसाठी लाचार पुढारी



पंकज पाटील (उपसंपादक)
BY ऑनलाईन तरुण गर्जना
८ ऑक्टोबर २०१९


अमळनेर  मध्ये विधानसभेचा रणसंग्राम दिवसंदिवस  अधिकच गुंतागुंतीचा होत असल्याचे चित्र आहे .अमळनेर नगरपालिकेच्या रणसंग्रामात ज्यांनी दमदार आमदारांच्या गाड्या उलट्या केल्यात तिच राजकीय मंडळी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गाडीच्या  टप्पावर बसून ‘माझ मत शिरीषदादांना ‘असा प्रचार करतांना दिसली .ज्या कृषिभूषण आमदार साहेबराव पाटील यांनी या तालुक्यात आमदारकी भोगली त्यांचा पक्ष निष्ठेने  पोपट केला .त्यांना विद्यमान आमदार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  सारथी बनवले .


या रणसंग्रामात आता अमळनेर च्या जनतेचे एवढेच लक्ष लागून आहे .२०१४ च्या निवडणुकीतएकच वादा फक्त अजित दादा’ चा नारा लावणारे कृषिभूषण यांना देखिल विद्यमान आमदार यांनी गाडीच्या टपावर बसवत प्रचार फेरीत सहभागी करून घेतले .ज्या कृषिभूषण यांचा टांगा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पलटी केला होता. तेच कृषिभूषण साहेबराव दादा शिरीष दादा यांचा टांगा कार्यकर्ते बनून  पलटी करतात का ? की  स्वतः त्या टांग्यात बसून तो विधानसभे पर्यंत पोहचवतात ? याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे .


लोकशाही तंत्रात किती विविध खेडाळू असतात हे अमळनेरच्या जनतेला पाहायला मिळत आहे.रामाचे राज्य समजून जनहिताच्या पादुका सिहासनावर ठेवत राज्य करणारा राजा भरत पण आजच्या राजकारणात जो तो स्वतःलाच राम समजून काम मात्र रावणासारखे करत असल्याच्या अनुभव जनतेला येत आहे.


पक्ष निष्ठेचा गप्पा मारत स्वतःचे राजकीय अस्तित्व अबाधित  राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे.२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पुढारी यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी तालुक्यात केलेला घात-पात  आज त्यांच्याच वाट्याला आला आहे.खासदारकीचे ,आमदारकीचे स्वप्न भंगले त्यासोबत जिल्हाअध्यक्ष पदही गेल आता उरले हातात फक्त पक्षाचे  झेंडे व कार्यक्रमातल्या स्टेजवरील नेत्यांच्या  बाजुला असलेल्या खाली खुर्च्या .एक विपरीत घडल तेही आपल्याच पक्षातल्या माणसांचे राजकारण संपवण्यात .ज्यांना मागच्या विधानसभेत सत्तेत आणल त्यांनीच यांच खासदारकीचे ,आमदारकीचे स्वप्न मोडल .दुसऱ्या साठी खोदत असलेल्या खड्यात आपण कधी पडलो हेच समजल नाही . आज त्यांच्यावरच इच्छा नसतांना विद्यमान आमदार यांचा प्रचार करण्याची वेळ आली . प्रचार सभेत शरीराने जरी ते  उपस्थित होते तरी ते  मनाने सोबत नसल्याचे चित्र जनता पहात होती. जनतेला त्यांचे चेहरे पाहून हसावे का ? रडावे हेच समजत नव्हते .


कृषिभूषण यानी विद्यमान आमदार यांच्यावर सार्वजनिक व्यासपीठावर कलगीतुरे उडविले पण विद्यमान आमदार यांचे अहंकाराने व अभिमानाने भरलेले शब्द खरे ठरलेत ,’मी या बटासले मना प्रचार कराले लावसू ‘ आता त्यांचे हे बोल खरे ठरण्यासाठी त्यांनी कृषिभूषण व भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान पुढारी यांच्या समोर किती लोटांगण घातले हा विषय अभ्यासाचा असून  तो चार भिंतीतला आहे .




अमळनेर तालुक्यातील सत्तेसाठी चालू असलेले ही लाचारी उभा महाराष्ट्र पहात आहे .जनतेची सेवा करून आज मोदी लाटेत देखिल आमदार होणारे जनतेचे सेवक महाराष्ट्रात आहेत . त्यांचा आदर्श अमळनेर तालुक्यातील पुढाऱ्यांनी घेणे आवश्यक होते .राजकारण एकमेकाला संपवण्यात नसून जनतेची सेवा करणाऱ्याला  पुढे घेवून जाण्यात आहे .सत्तेसाठी लाचार झालेल्या अमळनेरच्या पुढाऱ्यांनी अपक्ष म्हणून जनतेची खऱ्या अर्थाने  सेवा व विकास केला असता तर आज जनतेच्या मनात ते राहिले असते व त्यांच्यावर ही लाचारीची वेळ आली नसती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध