Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

भटके, दुर्लक्षित समाजासोबत आरंभची दिवाळी साजरी





यावर्षी दिवाळी चा सण मोठ्या उत्साहात पार पडला, आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी सण हा नळदुर्ग शहरातील मरगम्मा वस्ती येथील पालवरच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आला.

या उपक्रमांनी त्यांचे दु:खे, उपेक्षा पूर्णपणे नाहीशी होणार नसली तरी काहींच्या आयुष्यात तरी आनंदाचा दिवा प्रज्वलित होत राहील.पणती मर्यादित प्रकाश देत असली तरी एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी पणती लावली तर आसमंत नक्कीच तेजोमय होईल यात शंका नाही.

शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात सामाजिक दरी आढळून येत असून एका बाजूला भव्यदिव्य दिवाळीचे आयोजन केले जात असताना दुसरीकडे मात्र एका वेळच्या जेवणाचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असतो. दिवाळीच्या फराळावर यथेच्छ ताव मारला जात असताना दुसरीकडे मात्र एक वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागत असते. 

मुख्य प्रवाहातून बाहेर असलेला हा समाज जिथे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतात तर काहींना भिक्षा मागून आपले पोट भरावे लागते. अशा उपेक्षित समाजासोबत काल 30 ऑक्टोबर रोजी मरगम्मा वस्ती येथे "आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या" वतीने दिवाळी साजरी करण्यात आली असून ही दिवाळी खूप अविस्मरणीय अनुभव देणारी होती कारण नियोजित वेळेला पावसाची उपस्थिती लागल्याने वरुणराजाच्या साक्षीने दिवाळी चा उत्सव पार पडला. यावेळी मुलांना फुलबाजे, फटाके तसेच फराळीचे साहित्य चिवडा, लाडू, चकली आदी वाटप करण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याचा अनुभव आरंभच्या सदस्यांना यानिमित्ताने मिळाला.

यावेळी आरंभ संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, सोशल मीडिया प्रमुख सुरज आवटे, मयुर महाबोले, रैतेश होर्टीकर,  सुमित यादगिरे, अभिषक आवटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध