Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर साखर कारखाना कोणी बंद केला नेत्यांना प्रश्न विचारा- डॉ जितेंद्र ठाकूर





शिरपूर:प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्याचे काय झाले एकमेकांवर आरोप करणारे मंडळी आता मांडीला मांडी लावून बसतात.त्या सर्व मंडळींना विचारा नेमका साखर कारखाना कोणी बंद केला.होळनांथे व थाळनेर येथील जनाशिर्वाद दौराच्या सभे दरम्यान डॉ जितेंद्र ठाकूर बोलत होते.
      दि १० रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांची जनाशिर्वाद दौरा आज तालुक्यातील होळनांथे व थाळनेर परिसरात गेला होता.या जनाशिर्वाद दौरा दरम्यान होळनांथे व थाळनेर येथे सभा घेण्यात आली होती.या सभेत अँड अमित जैन,कन्हैलाल पावरा,मोहन पाटील,मिलींद पाटील, चंदनसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष भाषणात डॉ जितेंद्र ठाकूर यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले की,माझ्या विरूध्द षडयंत्र रचले जात आहे.शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्याचे काय झाले एकमेकांवर आरोप करणारे मंडळी आता मांडीला मांडी लावून बसत आहेत त्या व्यक्तींना प्रश्न विचारा की नेमक साखर कारखाना बंद कोणी केला? तालुक्यातील शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारे आता पक्षप्रवेश करून निर्मळ होणार नाहीत.माझ्या सोबत कोणी नेता नसला तरी चालेल पण मात्र माझ्या सोबत जनता आहे.तालुक्यातील जनता योग्य तो न्याय देईल.असे ते बोलतांना 

म्हणाले.यावेळी मंचावर प्रमुख पाहुन म्हणून केवलसिंग राजपूत, मोहन पाटील, राजेंद्र गिरासे,

पदमसिंग जाधव,संभाजी पाटील, चंदनसिंग राजपूत,दत्तात्रय पाटील, नितीन राजपूत,मिलींद पाटील,रामेश्वर पाटील,सलीम शेख,जे.के,गोपाल राजपूत,आदींंसह मांन्यवर उपस्थित होते.सभेचे आयोजन डॉ जितेंद्र ठाकूर युवा सेना यांनी केले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध