Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

सत्ता स्थापनेत 12मतीचा पहिलवानची मोठी भूमिका




जळगाव प्रतिनिधी:-योगेश भोई 
महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापण्यासाठी तिढा  पडला आहे, सरकार स्थापन करायला अद्यापही कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला पाठिंबा देईल याकडे चर्चा चालली असून काँग्रेस कोणासोबत जाणार आहे याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे सोनिया गांधी यांनी सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना सरकार स्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले असल्याची सर्वत्र बातमी आहे परंतु शरद पवार हे कोणता निर्णय घेणार सध्या स्थितीमध्ये शरद पवार हे सेने बीजेपी चे भांडण बघणार की स्वतः कोणाला पाठिंबा घेऊन सरकार निर्माण करण्याची शक्यता करणार याबाबत चर्चा सुरू आहे, 

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असाच सेना भाजपाचा खेळ चाललेला आहे त्यामुळे सेना-भाजपाच्या नक्की मंत्रिपदाचा वाद कुठपर्यंत जाणार मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री सेनेचा की भाजपाचे पाच वर्षे राज्य करणार? 

की बारामतीचा तेल लावलेला पाहिलवान राज्यात नवीन घडामोडी घडविणार?  या कडे  राज्ययाती जनतेचे व राजकीय धुरीनांचे लक्ष लागले आहे.  

घोडा मैदान जवळ आहे 

लवकरच सर्वांचे डावपेच समजतील 

रुसलेली नवरी कमळा सोबत धनुष्यबाण गहाण ठेवेल की घडयाळी कडे बघत हाताशी हात धरण्याची वाट पहात तातत्पूरता घरोबा करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

एकूणच शरद पवार हे राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी असणार हे आज तरी निश्चित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध