
शिरपूर(प्रतिनिधी)तालुक्यातील भरवाडे येथील सरदार वल्लभभाई पटेल उन्नती मंडळ ,ग्रामस्थ व नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले भरवाडे येथील युवक यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक अखंड भारताचे निर्माते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रतिमापूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरवाडे गावाचे सरपंच भारती दिलीप पटेल व उपस्थित प्रमुख अतिथी दीपक भाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल वरुळ चे चेअरमन प्रमोद सोमजी पटेल ,शिरपूर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीप दगडू पटेल भरवाडे च्या उपसरपंच
अनीताबाई संजय पाटील डाॕ.बन्सीलाल चौधरी प्रमुख व्याख्याते चंपालाल पाटील ,एस.एन.पाटील व किशोर पटेल यांच्या यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यापूर्वी गावात असलेले प्रभू चक्रधर स्वामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,विर एकलव्य ,महर्षी वाल्मिक ऋषी आदी पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी धीरज चौधरी गौरव पटेल यांनी मनोगतात तरुण व्यसनाधिन होता कामा नये आपण सर्व मिळून गावाच्या विकासात हिरवे बाजार सारखा ठसा उमटू या असे मत व्यक्त केले. तर एस. एन पाटील यांनी चरित्र अलौकिक केव्हा होते ह्या विषयावर मनोगत व्यक्त करताना भारत मातेचे थोर सुपुत्र भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या चरित्रा ला अलंकृत करणाऱ्या विविध गुणां चा परिचय उपस्थितांना करून दिला, “राष्ट्रनिर्माण व युवक”या विषयावर चंपालाल पाटील यांनी आपले विचार मांडले की, राष्ट्राची सुरुवात व्यक्तीपासून होते म्हणून आपल्या जीवनात आपण बदल केला पाहिजे.स्वतः युवकांनी छोट्या छोट्या गोष्टींनी चरित्र घडवलं तर राष्ट्र आपोआप घडते. यासाठी युवकांनी समर्पण केले पाहिजे व्यसनाधीनता टाळली पाहिजे असे आवाहन केले. तर प्रमोद पटेल यांनी तरुणांना गावाशी व मातीशी इमान राखत आई-वडिलांची सेवा करावी असे आवाहन केले तसेच दिलीप भाई पटेल यांनी गावात सर्व जाती-धर्मात अरे एकोपा असून सर्व समाज गुण्यागोविंदाने राहून गावाचा विकास करण्यासाठी आजच्या दिवशी कटिबद्ध होऊ या असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भाई पटेल,प्रास्ताविकात के.एन .पटेल यांनी युवकांच्या भरवाडे गावासाठी करणार असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर आभार मिलिंद पटेल यांनी व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरदार वल्लभ भाई पटेल उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी मिलींद पटेल, शुभम पटेल, चेतन पटेल, पुष्पक पटेल, परेश पटेल, ललेश चौधरी, हिमांशू पटेल ,ललित चौधरी, यश पटेल, मनीष पाटील, ललित पटेल, हर्षल पटेल ,निखिल पटेल ,नयन पटेल, अक्षय पटेल, जुगल पटेल, मनोज चौधरी, तन्मय पटेल ,रोहित चौधरी, हर्षल चौधरी, ऋषिकेश चौधरी मनीष पटेल ,जयेश पाटील , कृष्णा पटेल, यतीश पटेल, परेश पटेल यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा