Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

रंगपंचमी व्याख्यान मालेच्या अध्यक्षपदी विठोबा पाटील आणि सचिवपदी अनिल महाजन







रावेर:प्रतिनिधी:अजीज शेख  येथील रंगपंचमी व्याख्यान मालेच्या अध्यक्षपदी विठोबा पाटील आणि सचिवपदी अनिल महाजन यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. विश्वस्त डॉ राजेंद्र आठवले यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या व्याख्यानमालेसाठी संभाव्य वक्ते, त्यांचे विषय याबाबत मार्गदर्शन केले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतरच्या पंधरवड्यात व्याख्यान मालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मावळते अध्यक्ष सचिन जाधव, हेमेन्द्र नगरिया, प्रतिक महाजन, कैलास वानखेडे यांनीही सूचना मांडल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध