Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात माणसांच्या वागणुकीचा विचित्र घटना समोर येत असतांना माणसातल्या माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन देखील घडत आहे



अमळनेर प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात माणसांच्या वागणुकीचा विचित्र घटना समोर येत असतांना माणसातल्या माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन देखील घडत आहे.अमळनेर येथिल सोमनाथ नाथजोगी व रवी बडगुजर यांनी पैसे, बँकेचे कार्ड व महत्वपूर्ण कागदपत्रे असलेले रस्त्यावर पडलेले पाकीट, मालकाचा अत्यंत हुशारीने शोध घेऊन  प्रा.लिलाधर पाटील यांना परत केले व प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.

                   
अमळनेर येथील झामी चौक परिसरात  चौलाफल्ली  विकून गुजराण करणाऱ्या सोमनाथ हिरामण नाथबुवा  यांना रस्त्याने जातांना एक पाकीट सापडले. या पाकिटात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व कागदपत्रे होती यातून हे पाकीट घाई गडबडीत भाजीपाला घेऊन परतत असताना लिलाधर पाटील यांचे खिशातून गांधीनगर येथील रस्त्यावर पडले. 

बाजारातूनच परतणाऱ्या हि बाब सोमनाथ नाथजोगी यांच्या लक्षात येताच त्यांनी हे पाकीट आपले मित्र रवी टेलर (बडगुजर) यांना दाखवून ते परत कसे करता येईल याची विचारणा केली.कार्डांवरील माहितीतून नाव कळले तरी संपर्क फोन नंबर नव्हता.यात केबल नेटवर्कचे बिल भरल्याची पावती होती. यावरून रवी टेलर यांनी पावतीवरील केबल मालक मिलिंद शिंदे यांच्या मोबाईल नंबर ला फोन करून पावतीवर लिलाधर पाटील यांचे नाव असल्याचे सांगितले. मिलिंद शिंदे यांनी आपले केबल ग्राहक असलेले प्रा लिलाधर पाटिल यांना फोन करून सदर माहिती दिली. 

यानंतर लगेच प्रा पाटील यांनी रस्त्यातून माघारी फिरत सोमनाथ नाथजोगी व रवी टेलर यांची छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ  प्रयत्नपूर्वक भेट घेऊन प्रामाणिकपणे पाकीट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रा. पाटील यांनी सोमनाथ नाथजोगी व रवी टेलर यांचे आभार मानले.तसेच कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी ही सोमनाथ व रवि टेलर यांचे दुरध्वनीने फोन  दाखवलेल्या प्रामाणिकपणा व माणूसकीसाठी करून कौतूक केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध