Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
चार जूनला पहाटेपासून ते सकाळी दहापर्यंत असेल सक्रीय...! धुळे जिल्ह्यावर घोंगावतेय चक्रीवादळाचे संकट...!
चार जूनला पहाटेपासून ते सकाळी दहापर्यंत असेल सक्रीय...! धुळे जिल्ह्यावर घोंगावतेय चक्रीवादळाचे संकट...!
धुळे प्रतिनिधी:गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरुन येणारे चक्रीवादळ एक ते चार जून दरम्यान धुळे जिल्ह्यातुन जाण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सदर कालावधीत वा-याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़.
तुम्ही आता LIVE बघू शकता कि वादळ कुठे आहे
या निळ्या लिंक वर क्लिक करा
windy.com
चार जून रोजी पहाटे चार वाजता साक्री म्हसदी वरून लामकानी ,चिमठाणे मार्गे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वर्शी, थाळनेर, लामकानी, चिमठाणे मार्गे त्याच दिवशी सकाळी नऊला शिंदखेडा, जैतपूर वरुन शिरपूर , सुळे मार्गे सकाळी १० वाजता खरगोण, मध्य प्रदेशकडे सरकणार आहे़.
आपले गाव वरील ठिकाणांपासून १५० ते २०० किमी च्या आत असल्यास आपल्याकडेही ०३ जुनच्या पहाटे पासून ६ जूनच्या सायंकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे़
निसर्ग चक्रीवादळ आणि अतीवृष्टीच्या दरम्यान नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत़ मच्छीमार व अन्य व्यक्तींनी नदीमध्ये जावु नये, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ सुरक्षीत स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवुन स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवती भोवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विेजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे, आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे, आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात, हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात, सोबत आवश्यक अन्नधान्य पिण्याचे पाणी,औषधे जवळ ठेवा, आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य दयावे, पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे, सदयस्थितीत जिल्हयात विलगीकरणात असलेले नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेकांत मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02562- 288066 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे़
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा