Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ जुलै, २०२१

मेंढपाळ ठेलारी समाजचे वनविभागा च्या कार्यालयातील अधिकाऱ्याचे श्राद्ध घालून मुंडन आंदोलन..!



धुळे प्रतिनिधी:- मागील दोन वर्षा पासून कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे कोणाच्या नोकऱ्या गेल्या कोणाचा धंदा बंद पडला हे सर्व जगा समोर येत आहे परंतु रानावनात मुकाट पणे आपल्या मेंढयांना घेवुन मेंढपाळ ठेलारी समाज आपले जिवन व्यतीत करतो दोन वर्षाच्या कोरोना काळात ना कोणा समोर आपली व्यथा मांडली ना कोणा कडुन मदत मागीतली परंतु महाराष्ट्र शासनाने धुळे येथील मेंढपाळ ठेलारी समाजास वनचराई समजोत्यात चराई रान मंजूर करण्यात आले आहे ते वनचराई समजोता झाल्या पासुन आज पर्यंत ती वनचराई जमीन फक्त कागदावरच आहे.

मेंढपाळ ठेलारी समाज वर्षानुवर्षे मेंढी वनचराई जमीन दाखवण्यासाठी मेंढपाळ ठेलारी समाजाने शेकडो निवेदने आंदोलने
व मोर्चे काढण्यात, आली परंतु वन कार्यालयास आज पर्यंत जाग येईना मग ज्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही म्हटल्यावर ते अधिकारी मयत झाले असे समजून हिंदु परंपरे नुसार अधिकाऱ्यांनीचे आज रोजी श्राद्ध घालुन मुंडन आंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे. 

की उपवन संरक्षक कार्यालयाने कुठलीही खबरदारी न घेता आमच्या आमच्या मागणीचा निर्णय न झाल्यास दि. १५/०७/२०२१ रोजी संपुर्ण उपवन संरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा निर्वानीचा इशारा मेंढपाळ ठेलारी समजा व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे या आंदोलनात शिवदास वाघमोडे, रामदास कोरडे, दिनेश सरक, मोतीराम गरदरे, पंकज मारनार, प्रविण खामगळ, ज्ञानेश्वर सुळे, मोहन भिवरकर, गोविंदा रुपनर, नाना पडळकर, नाना ठेलारी, समाधान ठोंबरे, पिंटु भिवरकर, रामचंद्र पडळकर, संदिप वाघमोडे, आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध