Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ जुलै, २०२१

प्रकाश चव्हाण यांची राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारासाठी निवड..!



नाशिक इंदिरानगर प्रतिनिधी:
जि.प.प्राथमिक शाळा करंजवन ता दिंडोरी शाळेतील  शिक्षक  प्रकाश चव्हाण यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार त्यांना जाहीर झाला. 

मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञानात (आयसीटीत )योगदान देणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार दिले जातात. देशभरातून २४ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली प्रकाश चव्हाण यांना राष्ट्रपतींच्या हस्ते  गौरविण्यात येणार आहे. 
  
नाशिकला राष्ट्रीय स्तरावर ICT पुरस्कारने प्रथमच मान मिळाला आहे. शिक्षकांची शालेय अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अध्यापन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या  शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देण्यात येतो.  
चव्हाण यांनी २०१२-१३ पासून तंत्र ज्ञान क्षेत्रात वेगळ्या वाटेने काम करायला सुरवात केली होती तत्कालीन शाळा  बोरस्ते वस्ती ता.निफाड हि बंद पडण्याऱ्या शाळेला त्यांनी आपल्या कौशल्याने राष्ट्रीय  स्तरावर नावारूपास आणले होते.२०१५ ते २०१७ या दोन वर्षात शाळेला ३५०० हून अधिक शिक्षक अधिकारी पदाधीकारींनी भेटी देऊन अध्ययन अध्यापनात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर समजून घेतला होता त्या शाळेसाठी अँड्रॉइड  टी व्ही. प्रोजेक्टार , संगणक लोकसहभागातून त्यांनी मिळवून दिले होते.
 
त्यांनी महारष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण अंतर्गत दीक्षा अँप घटक निर्मिती, एक स्टेप पोर्टल वर स्वत: कामकाज केले आहे. २०१५ ते २०१७ य काळात निफाड तालुक्यातील १००% शिक्षकांना त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात पारंगत करण्याण्यासाठी कार्यशाळ घेतल्या आहेत जिल्हा स्तरावर तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे ते सुलभक म्हणून कामकाज करतात जिल्ह्यातील शिक्षकांसाठी त्यांनी आज पर्यत २५ हून अधिक कार्यशाळा घेऊन शिक्षकांना समृद्ध केले आहे. तसेच ऑनलाईन अप्लिकेशन निर्मितीच्या त्यांनी युट्युब द्वारे ५ कार्यशाळा घेतल्या आहेत.कोरोना  काळात ऑनलाईन  शिक्षण देण्याचे माध्यम झूम क्लास , कॉन्फरन्स कॉल, गुगल क्लास रूम याबाबत दिंडोरी तालुक्यातील १००% शिक्षकांना त्यांनी पारंगत केले आहे तर जिल्हास्तरावर ३ दिवस कार्यशाळेचे नेतृत्व केले आहे
          
मुलांचे शिकणे सोपे व्हावे त्यांनी १५ पेक्षा जास्त अप्लिकेशन तयार केले असून प्ले स्टोअर वरून हजारो शिक्षकांनी पालकांनी ते डाऊनलोड केले आहेत व राज्यातील हजारो शाळेतील विद्यार्थी त्यांच्या अप्लिकेशन च्या साहिय्याने कोरोना काळात स्वयं अध्ययन करीत आहेत. 

चव्हाण यांची राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारासाठी निवडीबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,शिक्षण सभापती सुरेखा दराडे , दिंडोरी प स सभापती कामिनी चारोस्कर,उपसभापती वनिता अपसुंदे ,प स सदस्या मालती खराटे, मुख्यकार्य अधिकारी लीना बनसोड,
प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झणकर,दिंडोरीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज,विस्तार अधिकारी सुभाष पगार,केंद्रप्रमुख दिनेश जगताप, शाळेतील,मुख्याध्यापक  व शिक्षक वृंद आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध