Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ७ जुलै, २०२१

शामकांत ईशीच्या नेतृत्वाखालीशिरपूर युवक महासभेचे कार्य राज्याला आदर्श- विजयभाऊ चौधरी



शिरपूर(प्रतिनिधी)महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर युवक आघाडीचे कार्य उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे असून राज्याने आदर्श घ्यावा असे सुत्य काम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजयभाऊ चौधरी (नंदुरबार) यांनी शिरपूर  येथे सत्कार 
प्रसंगी व्यक्त केले.

प्रांतिक तेली समाज युवक महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांचे शिरपूर निवासस्थानी तेली समाज महासभेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा युवक महासभेतर्फे सत्कार तेली समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला
  
याप्रसंगी बोलतांना त्यांनी सांगितले की शामकांत ईशी यांचे कार्य राज्याला मार्गदर्शक असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवक महासभेचे कार्य जोरात असून शिरपूरातून राज्याला एक चांगले नेतृत्व दिल्याने शिरपूरकरांचे अभिनंदन करतो शिरपूर युवक महासभेने अनेक उपक्रम राबवून राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यासारखे उपक्रम राबवून राज्याला आदर्श निर्माण केला आहे शिरपूर चे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे सांगून त्यामुळेच शामकांत ईशी यांना राज्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे सांगून शिरपूर च्या युवक महासभेचे कौतुक केले.

याप्रसंगी युवक महासभेचे विभागीय उपाध्याय सिंदखेडा मा नगरसेवक दिपक चौधरी,मंदार विजय चौधरी, तेली समाज पंच मंडळ उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,सचिव जगदीश चौधरी,सहचिटनिस रमेश महाले,  तेली समाज युवक आघाडीचे विभागीय उपाध्यक्ष आशिष चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष महेश चौधरी, तेली समाज युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी,शहराध्यक्ष सुनिल सुरेश चौधरी,कार्याध्यक्ष दिनेश चौधरी,तेली समाज पंच मंडळ सदस्य उत्तम चौधरी,
चेतन चौधरी,सुरेंद्र चौधरी, जितेंद्र सोनवणे, डॉ विजय चौधरी,मनोज चौधरी,श्री विघनहर्ता संताजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनिल ताणकू चौधरी, मोहन भिला चौधरी, राजू चौधरी,डोकटर्स क्लबचे मा अध्यक्ष डॉ सुनिल ईशी,सोहन चौधरी,जयेश सुभाष चौधरी, सुनील मंडकू चौधरी,संजय दगा चौधरी,नरेश चौधरी,दिनेश चौधरी,प्रकाश चौधरी,आकाश चौधरी, युवराज चौधरी,सचिन चौधरी, सुनिल चौधरी (कुवे),प्रतिक ईशी,मयूर ईशी,वेदांत चौधरी, कुणाल चौधरी,सोमा चौधरी, कमलेश चौधरी यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांनी सूत्रसंचालन चेतन चौधरी सर, यांनी तर आभार तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी यांनी माणलेत याप्रसंगी तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी,शहराध्यक्ष सुनिल चौधरी व सर्व पदाधिकारी यांनी विजयभाऊ चौधरी यांचा सत्कार केला या छोटेखाणी सत्काराने ही विजयभाऊ चौधरी हे भारावून गेले होते.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध