Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ जुलै, २०२१

शिंदखेडा नगरपंचायत मुख्य अधिकारी व प्रशासकीय अधिकारी विरुद्ध नगरसेविकेची तक्रार



शिंदखेडा प्रतिनिधी:येथील नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी मुख्यालयी थांबत नसल्याने नागरी सुविधा आणि आरोग्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सौ.वंदना चेतन परमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी नगरपंचायतीची गत झाली असतानाच आता सत्ताधारी नगरसेविका यानीच प्रशासनाविरोधात तक्रार केल्याने चर्चेला ऊत आला आहे. 

दरम्यान सौ.परमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्याधिकारी प्रशांत बीडगर आणि प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे हे शिंदखेडा येथील मुख्यालयी न थांबता शिरपूर येथून अप-डाऊन करतात परिणामी शिंदखेडा येथील विविध सुरू असलेल्या विकास कामे पाणीपुरवठा,सार्वजनिक स्वच्छता,गटारी आणि रस्त्यांच्या कामावर पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे‌ कोरोणाची जीवघेणी साथ शिंदखेडा शहरात सुरु असतानाही वरील अधिकारी बाहेरगावी रहात असल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याबाबत पूर्णतःदुर्लक्ष केले आहे. 

यापूर्वी असलेल्या अधिकाऱ्यांनी पहिल्या लाटेमध्ये उत्कृष्ट काम करून कोरोनाला रोखले होते मात्र यंदा संपूर्ण यंत्रणा कोसळली असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे आणि ते राहत नसल्यामुळे शासकीय नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सौ परमार् यांनी केली आहे सदर निवेदन भूसंपादनाच्या उपजिल्हाधिकारी सौ सुरेखा चव्हाण यांनी स्वीकारले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध