Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ जुलै, २०२१

ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करून,जातिनिहाय जनगणना करण्यात यावी



शिंदखेडा प्रतिनिधी: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवणे करिता आवश्यक ईम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करण्यात यावा यासाठी आज दि. 2 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. त्याच पार्श्र्वभूमीवर आज शिंदखेडा तालुका/शहर महा. प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीच्या वतीने शिंदखेडा तहसिलदार सुनील सैंदाने यांना निवेदन देण्यात आले. 
 वरील मागण्यांची त्वरित अंमलबजावणी केली नाहीतर  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदनातून सांगण्यात आले आहे.
यावेळी महा. प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, तालुका उपाध्यक्ष योगेश चौधरी, संदीप चौधरी, विजय चौधरी, संतोष चौधरी, कैलास चौधरी, देवराम चौधरी, देविदास चौधरी, अरुण चौधरी, धर्मेंद्र चौधरी, मनोज चौधरी, नारायण चौधरी, रुपेश चौधरी, वैभव चौधरी पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध