Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ जुलै, २०२१

ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसची टीम व शिरपूर तालुका ट्रॅक चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हाडाखेड येथील सदभाव कंपनीचा महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट येथे मोठा भ्रष्टाचार



शिरपूर प्रतिनिधी:ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसची टीम व शिरपूर तालुका ट्रॅक चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हाडाखेड येथील सदभाव कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांची काट्याची तपासणी वेट अँड मेजरमेन्टं विभागाचे अधिकारी श्री.पाटील,श्री.दलाल साहेब यांनी केली असता चेकपोस्ट वरील 11 काटे हे फॉल्टी ठरविण्यात आले.

त्यामुळे हे सर्व काटे सील करण्यात आले येथील काट्या मध्ये 40 ते 200 किलो इतका फरक असल्या मुळे वाहतूकदारांवर खोटी कारवाई करून वाहतूकदारांची फसवणूक करण्यात येते व त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो हे वाहतूकदारांची पिळवणूक व फसवणूक आहे आज पर्यंत करोडो रुपयांची फसवणूक वाहनधारकांची करण्यात आली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारला निवेदन आहे की करोडो रुपये वाहन धरकांचे परत करण्यात यावे व सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड कंपनीला ब्लॅकलिस्ट करून बंद करण्यात यावे.

यावेळी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस चे नाशिक,धुळे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन जाधव, किरण भालेकर, शिरपूर तालुका ट्रॅक चालक मालक संघटनाचे अध्यक्ष व aimtc चे mc member श्री. किशोर अप्पा राजपूत, नरेश पवार, सजय जैन, चारुदत्त पाटील, राजु जैन, विजय बागले हे पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध