Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ जुलै, २०२१
आंतरजातीय विवाहितांना ‘सामाजिक न्याया’चे बळ…!
620 जोडप्यांना 2 कोटी 60 लाख 38 वाटप..!
राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.सन 2020-21 मध्ये नाशिक विभागातील 620 विवाहित जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्याचे तात्काळ वाटप केले आहे. अर्थसहाय्य मिळाल्यामुळे विवाहित जोडप्यांच्या संसाराला आर्थिीक बळ मिळाले आहे.
अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत,बौध्द,शीख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह म्हटला जातो.तसेच अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामधील आंतरप्रवर्गातील विवाहित जोडप्यांच्या विवाहास ही आंतरजातीय विवाह म्हणून शासन मान्यता आहे.
या योजनेत प्रत्येक जोडप्याला रू.50 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना पती व पत्नीच्या संयुक्त नावाने धनाकर्ष प्रदान करण्यात येत असतो.सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असते.नाशिक विभागात सन 2020-21 या आर्थिधक वर्षात 620 जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. यात नाशिक -120 जोडप्यांना 60 लाख रूपये,धुळे -100 जोडप्यांना 50 लाख रूपये,नंदुरबार-60 जोडप्यांना 30 लाख रूपये,जळगांव - 120 जोडप्यांना 60 लाख रूपये,अहमदनगर - 120 जोडप्यांना 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिलक सहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत. जातीचा दाखला व आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदार यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा