Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१
विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कोरोनामुक्त गावाच्या सरपंचासोबत चर्चा
शिरपूर प्रतिनिधी: धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली ज्यात जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावाच्या सरपंचांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.ज्यात साक्री तालुक्यातील कासारे व प्रतापपुर, शिरपूर तालुक्यातील बोरगाव व जळोद, शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे व वाघोदा व धुळे तालुक्यातील नांद्रे ग्राम पंचायतीचा समावेश होता.
डॉ गोऱ्हे यांनी कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांचे अभिनंदन केले व संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात उपाययोजनां विषयी माहिती घेतली. त्या पुढे म्हणाल्या की आज जरी तुमचे गाव कोरोनामुक्त आहेत तरी ते भविष्यातही कोरोनामुक्तच राहतील ह्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे, गाफील राहून कोरोनाचा शिरकाव होऊ देऊ नये म्हणून नेहमी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
धुळे जिल्हाने कोरोना रोखण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात नावलौकीक केले. लगान चित्रपटाचा दाखला देत डॉ गोऱ्हे म्हणाल्या की जसे लगान चित्रपटात एक साधी गरीब टीम हळूहळू पूर्ण मॅच जिंकते व सर्वांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेते तसेच काहीसे धुळे जिल्ह्याने करून दाखविले आहे.
साक्री तालुक्यातील कासारे सरपंच विशाल देसले यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील सरपंचासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हीडिओ-काँफेरेन्स द्वारा संवाद साधला होता व त्यावेळी त्यांनी दिलेल्या कोरोना संदर्भातील सूचनांचे मी गावात पालन करीत आहे.
शिरपूर तालुक्यातील बोरगाव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी डॉ गोऱ्हे यांना कोरोनामुक्त गाव संदर्भात गावात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच शासनाने कोरोनामुक्त गावांना विशेष बक्षिसं द्यावे अशी विनंती केली त्यावर त्यांनी स्मित हास्य देत होकारार्थी प्रतिसाद दिला.
कोरोना आढावा बैठकीत साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,श्री भाऊसाहेब हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए जे तडवी,सहाय्यक गटविकास अधिकारी (ग्राप) पी एस महाले, साक्री तालुका कासारे सरपंच विशाल देसले, प्रतापपूर सरपंच ऋतुराज ठाकरे, शिरपुर तालुका बोरगाव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया,शिंदखेडा तालुका लोहगाव सरपंच महेंद्र पाटील, वाघोदा सरपंच गोविंद वाघ, धुळे तालुका नांद्रे सरपंच अनिल पाटील उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा