Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

निंभोरा बु येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!



निंभोरा (प्रतिनिधी) निंभोरा बु येथे दरसाला बाद प्रमाणे या वर्षी देखील अण्णाभाऊ साठे यांची 101वि जयंती शासनाचे कोरोना प्रतिबंध नियम पाळून ज्ञानेश्वर उमक व नवाज पिंजारी यांनी नियोजन केल्या प्रमाणे कृषी विद्यालय निंभोरा येथे साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी रावेर पं स सभापती कविताताई हरलाल कोळी ह्या होत्या तर दीपप्रज्वलन पं स सभापती तथा रा काँ पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपकभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला पं स च्या उप सभापती धनश्री सावळे निंभोरा येथील सरपंच सचिन महाले जेष्ठ नेते माजी सरपंच प्रल्हादभाऊ बोडे सचिन पाटील ता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रावेर निंभोरा ग्रा पं सदस्य मनोहर तायडे,सतिष पाटील,स्वप्नील गिरडे,अकिल खाटीक,मधुकर बिऱ्हाडे,शे दिलशाद,सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी ,संदीप सावळे,जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे मोहन बोडे सागर तायडे वाय डी पाटील, प्रशिक तायडे,अजय मोरे,भुषण बोरनारे,विष्णु उबाळे बबन उमक समाधान दांडगे भारत उमक यांसह सर्व मातंग समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात ग्रा प सदस्य मनोहर तायडे यांनी प्रस्तावना तसेच आपले मनोगत व्यक्त करताना अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्र बद्दल समाज बांधवांना प्रबोधन देखील केले तसेच पं स सभापती कविता ताई पं स सदस्य दीपक भाऊ प्रल्हादभाऊ बोडे गुलाब मंसुरी यांसह अन्य पदाधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व जेष्ठ पत्रकार राजीवजी बोरसे यांनी सुत्र संचालन तर दस्तगिर खाटीक यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध