Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

दोंडाईच्यात जुगार खेळणाऱ्या दोन नगरसेवकांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल...!



मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगारात चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत-तपासात जुगारांना परवानगी देणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा..!


दोंडाईचा प्रतिनिधी: येथे दोंडाईचा-शहादा रस्त्यावर नगरसेवकाच्या बंद पडलेल्या जेवणाच्या धाब्यावर सुरू असलेल्या जुगारावर काल रात्री दहा वाजता अचानक धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला.यावेळी दोन नगरसेवकांसह अकरा जणांवर जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल झाला असुन, त्यांच्याकडून चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये जुगार अँक्टच्या विविध भादवि खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरात करोना-डेल्टा पल्सच्या नावाखाली कडक लाँकडाऊन जनतेकडून पाळवले जात असुन मग ऐवढ्या मोठ्या संख्येने व ऐवढ्या मोठ्या रकमेत जुगार कसा खेळायला परवानगी मिळाली असेल असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे. म्हणून गुन्हा दाखल झाला असेल तर पुढील पोलीस तपासात यांना जुगार खेळायला परवानगी देतो कोण,यांचा गाँडफादर कोण याचाही धागादोरा लागुन गुन्ह्यात समावेश करायला हवा,असा गुहार-कयास शनीवार-रवीवार दुकाना बंद ठेवण्यात आलेल्या नागरिकांकडून लावला जात आहे.

याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी-रविवार रात्री दहा ते एकच्या सुमारास दोंडाईचा-शहादा रस्त्यावर नगरसेवक छोटू नामदेव मराठे यांच्या मालकी हक्काच्या पत्र्याच्या शेडमधील बंद पडलेल्या हाँटेल द्वारकाच्या पाठीमागील शेतात बंदीस १) फकिरा दशरथ थोरात (वय.3७ रा. आंबेडकर चौक दोंडाईचा), २) संजय सुर्यकांत लोहार (वय. ५२ रा. सर्वोदय कॉलनी दोंडाईचा),  ३) कृष्णा नथ्थु कोळी (वय. ३६, रा. वाल्मिक नगर सांरगखेडा), ४) नगरसेवक छोटू नामदेव मराठे (वय.४६ रा. मालपुर रोड दोंडाईचा), ५) संतोष उर्फ अरुण मराठे (रा. डाबरी.घरकुल), ६) अशोक उत्तम  महाजन, (रा. राऊळ नगर दोंडाईचा), ७) राजधर कोळी (रा. रेल्वे कॉलनी दोंडाईचा), ८) भटु श्रीराम पाटील (रा. मंदाणे), ९) इम्रान खान उर्फ डमरु भाई ( रा.दोंडाईचा पूर्ण नाव माहीत नाही), १०)नगरसेवक नरेंद्र नाना कोळी (रा. सरकारी दवाखाना दोंडाईचा) ११) अशोक श्रीराम पाटील (रा. धावडे) असे सांगितले. यांच्या विरुद्ध  स्थानिक गुन्हे अन्वेषण मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर शिर्के यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक १८८७ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांनी त्यांचे नाव गाव सांगितल्याने त्यांची अंगझडती घेतली असता १६ हजार ५००/ रुपये रोख, तीन मोबाईल, ५२ पत्यांचा नवीन कॅटचा बॉक्स, १२ दुचाकी असा एकूण ४ लाख ४९ हजार ८७०/ रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरून हस्तगत केला आहे. 

 तसेच सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोहेकॉ रफिक पठाण, पोहोक प्रकाश सोनार, पोना संदीप पाटील, राहुल सानप, गौतम सपकाळे, पोकॉ सागर शिर्के, चालक पोहेकॉ संजय सूर्से, चालक पोकॉ कैलास महाजन यांनी केली आहे.

तसेच गावापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या दोंडाईचा-शहादा रस्त्यावर शनीवार-रविवार प्रशासनाकडून कडक लाँकडाऊन पाळवले जात असताना, मग ह्या ठिकाणी गर्दी जमवत ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जुगार कसा खेळवला जात आहे. यांना परवानगी देणारे यांचे गाँडफादर कोण आहे. याचाही तपास गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस विभागाने करत.त्यांचाही गुन्ह्यात समावेश करायला हवा.एकीकडे शहादा,नंदुरबार, नवापुर,शिरपुर, धुळे, जळगांव आदी ठिकाणी शनीवार-रविवार लाँकडाऊन जरी असला तरी किराणा दुकान, भाजीपाला व्यवसायिक यांना व्यवसाय करण्यास मुबा आहे. मात्र दोंडाईच्यात सर्व नियमावली लागु करून किराणा दुकान-भाजीपाला व्यवसाय बंद केले जातात. माजलेल्या चहा, हाँटेल, सलूच्या दुकानांना उघडे असल्यावर कानाडोळा केला जातो.हा दुजाभाव कुठपर्यंत योग्य आहे. म्हणजे कमी पुंजीत बिगर ओळखीने व्यवसाय करणारा तुटपुंज्या, हातावर पोट भरणारा हातपुंज्या असतील तर यांना शनीवार-रविवार बंदचा नियम व माजलेला-गाजलेला चहा-हाँटेल, सलूच्या दुकानांवर शनीवार-रविवार बंद डोळा ठेवण्याचे काम प्रशासनाचे योग्य नाही. म्हणून गावात ह्याच दुजाभावाची ओरड नागरिक मागील तीन आठवड्यापासून करत आहे. देणार तर सर्व व्यवसायिकांना मुबा द्या. अन्यथा सर्वांना सारखा न्याय करा,अशीही मागणी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जुगार खेळताना सापडल्याच्या पाश्वभुमीवर दुकाना बंद असलेल्या नागरिकांकडून निघत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध