Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

शिवसेना महिला आघाडी तर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनला रक्षाबंधन कार्यक्रम




शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुका महिला आघाडी व शिवसेना जिल्हा युवती सेना यांच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त सिंदखेडा पोलीस ठाण्यात व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदखेडा येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    
शिंदखेडा तालुका शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे एक दिवस आधीच रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात येतो शिवसैनिकांना रक्षाबंधन निमित्त शिवबंधन बांधणे तसेच सातत्याने जनतेची सेवा करणाऱ्या पोलिस बांधवांना देखील रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात येते या वर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात आला युवती सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सौ शिवानी दीपक पवार महिला आघाडीच्या तालुका उपसंघटक सौ अलका अरविंद कापुरे य युवती सेना शहर प्रमुख रवीना गणेश परदेशी तालुका येवती अधिकारी चारुशीला नरेंद्र साळुंखे रुबीना मुनीर पिंजारी वंदना धोंडू पवार शिवसेनेचे विधानसभा संघटक गणेश परदेशी तालुका समन्वयक विनायक पवार युवा सेना तालुका प्रमुख प्रदीप पवार युवा सेना विभाग प्रमुख विषाल ठाकरे दीपक पवार दिनेश साळुंखे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात तर शिवसेनेच्या शिव संपर्क कार्यालयात शिवसैनिकांना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा देऊन राख्या बांधण्यात आल्या



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध