Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

निमगुळ येथे १५ ऑगस्ट २०२१ रोजी करणी सेना व अखिल भारतीय अपराध विरोधी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सत्कार समारंभ संपन्न


     
दोंडाईचा प्रतिनिधी:शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात अखिल भारतीय अपराध विरोधी मोर्चा व करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून निमगुळ येथे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,तहसीलदार,दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेशन दुकानदार,पोलीस पाटील,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस, पत्रकार परीसरातील सामाजिक कार्यकर्ते ईत्यादी लोकांना ट्रॉफी आणि सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुदाम महाजन तर प्रमुख अतिथी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व निमगुळ येथील वैद्यकीय अधिकारी हितेंद्र देशमुख होते.

यावेळी तहसीलदार,पोलीस निरीक्षक, डॉ.हितेंद्र देशमुख,आयोजक दिनेश जाधव, पथारे येथील सरपंच डॉ.जयदिप जाधव TV9 मराठी चे धुळे जिल्हा प्रतिनिधी विशाल ठाकूर ईत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आयोजकांनी म्हटले की कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राबवत आहोत आज पथारे येथे देखील राबविण्यात आला तर दोंडाईचा परीसरात देखील हा कार्यक्रम योग्य वेळ पाहून आयोजन करून घेण्यात येईल पथारे येथील रहिवासी दिनेश भटूसिंग जाधव (अखिल भारतीय अपराध विरोधी मोर्चा महा.प्रदेश अध्यक्ष व करणी सेना प्रवक्ता) व पथारे येथील पाणीदार सरपंच डॉ.जयदिप भटूसिंग जाधव व यांच्या सहकारी मित्रांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंदू बागल यांनी तर आभार प्रदर्शन नंदू सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमगुळ येथील चंद्रकांत शिरसाठ, कल्याण बागल नंदलाल बागल,आशिष बागल रामी चे दशरथ गिरासे पथारे येथील पप्पू राजपुत, केवल न्हांजी,गब्बर राजपुत सह निमगुळ ग्रामस्थांनी आदी परीश्रम घेतले..!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध