Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

येवले शहरात बदापूर रोड येथील भोई समाजाचे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी चे मंदिर तोडल्याने भोई समाजाच्या भावना दुखावल्या



येवल प्रतिनिधी:येवले शहरात बदापूर रोड येथील भोई समाजाचे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी चे मंदिर तोडल्याने भोई समाजाच्या भावना दुखावल्या आहे,सुमारे दोनशे वर्षापुर्वी चे श्री लक्ष्मीआई मंदिराचे समाजाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता पाडण्यात आले समाजाचे काही लोकांनी याबाबत चौकशी केली. 

असता ती जागा खासगी मालकीची असून लवकरच बाजूला जागा देऊन मंदिराची उभारणी करून देऊ असे सांगण्यात आले मात्र दोन-तीन महिने उलटूनही यावर कोणतेच काम न झाल्याने आज भोई समाज यांच्यावतीने प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका कार्यालय व येवला शहर पोलीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाज अध्यक्ष श्री सुरेश खैरमोडे ,जगदीश उपाध्यक्ष जगदीश सोपे, शिवाजी लांडगे,संतोष सासे दीपक कातवटे, वाल्मीक सोपे अशोक सासे, योगेश सोपे आदी उपस्थित होते .  

यावेळी प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांना त्वरित मंदिर बांधून देण्याच्या सूचना कराव्या अन्यथा भोई समाज तीव्र आंदोलन छेडेल असे ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी सांगितले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध