Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे पिंपळनेर पोलिसांची अवैध गोवंश तस्करीवर मोठी कारवाई: 12लाख 90,000 चा मुद्देमाल हस्तगत..!
धुळे पिंपळनेर पोलिसांची अवैध गोवंश तस्करीवर मोठी कारवाई: 12लाख 90,000 चा मुद्देमाल हस्तगत..!
दि 30/12/2021 गुरुवार रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पिंपळनेर पो.स्टे.हद्दीत नवापूर ते पिंपळनेर रोडवरून गोवंश जनावरांची अवैध रित्या वाहतूक होणार असलेबाबत गोपनीय माहितीवरून गोवंश वाहतूक करणारा टाटा कंपनीची मालट्रक क्र. MH.14.V.5696 ताब्यात घेतला असून त्यात टाटा कंपनीची 1613 टर्बो मॉडेल ची मालवाहतूक ट्रक किंमत अंदाजे 10 लाख गोवंश जातीचे एकूण 21 जनावरे किंमत एकूण 2,90,000.असा एकूण 12 लाख 90,000.रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे सदर जनावरे देऊर, ता.साक्री येथील चतुरमुथा पांजरपोळ एवं प्राणीरक्षक संस्था येथे पाठविण्यात आले असून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे.
पोलिस नाईक विशाल मोहणे,चेतन सोनवणे,पो.काॅं. मकरंद पाटील,सोमनाथ पाटील,रविंद्र सूर्यवंशी ,नरेंद्र परदेशी या पथकाने केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा