Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

भल्या-भल्यांचा बाजार उठवणारा नेता (मुख्यमंत्री)उद्धव ठाकरे साहेब !!



राजकारणात अनेक वाचाळवीर असतात. दुर्दैवाने नारायण राणे यांच्या सारखे माजी मुख्यमंत्री, तीन वेळा विरोधी पक्षनेते, महसूलमंत्री आणि केंद्रीय मंत्री.इतकी मोठी पद भूषवणारे व्यक्तिमत्व आणि त्यांची मुलं इतकी वाचाळांसारखी वागतायत हे खरं तर अत्यंत अशोभनीय आहे.

एक काळ असा होता कि, राणेंच्या नावावर कोकणात १०-१२ आमदार निवडून यायचे आणि राणे उर्वरित महाराष्ट्रात प्रचाराला फिरायचे. विरोधी पक्षाला सुद्धा राणेंचा दबदबा चांगलाच माहित होता. कोकणात दादांन विरोधात बोलायची कोणाची हिंमत नसायची.अन्यथा त्यांच्यासमोर सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक यांच्या सारखी अनेक उदाहरण असायची. इतका दबदबा असणाऱ्या राणेंना उद्धव ठाकरेंनी दखल नं घेता जेरीस आणले.विनायक राऊत, वैभव नाईक, उदय सामंत,दीपक केसरकर, सतीश सावंत आणि संदेश पारकर या उद्धव ठाकरेंच्या पाच-सहा शिलेदारांनीच राणेंना हैराण करून सोडलंय.उद्धव ठाकरे फार क्वचितच राणेंवर भाष्य करतात. राणेंना ते फारशी किंमत देतं नाहीत.मात्र राणेंचा असा एकही दिवस नाही कि,जो उद्धव ठाकरेंचे नावं नं घेता उजाडला असेल.ज्या राणें विरोधात उमेदवारी भरायला उमेदवार सापडायचा नाही,त्या राणेंना तब्बल २ वेळा निवडणुकीत पराभूत करायचा चमत्कार उद्धव ठाकरेंनी करून दाखवला.राणेंच्या मुलाला २ वेळा खासदारकीला पराभूत केला.केंद्रीय मंत्री असतांना नारायण राणेंना थेट अटक, ते सुद्धा केंद्रीय मंत्री असतांना हें राणेंच्या चेहऱ्यावर आणि पर्यायाने मोदींच्या मंत्र्यावर केलेला वार आहे. 

जेवणाच्या ताटावरून उठवून राणेंना अटक करण्यात आली.नितेश राणेंची पळापळ
नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश गेली अनेक दिवस वॉन्टेड आहेत. नितेश ला उचलण्यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. राणेंच्या घराची झडती घेतली जात आहे.
मी गेली २९ वर्ष राणेंचा राजकीय प्रवास जवळून पाहतोय. सिंधुदुर्गात राणेंची हि केविलवाणी अवस्था यापूर्वी कोणी कधीच पाहिली नसेल. याला सर्वस्वी राणेंचा अहंकार आणि त्यांच्या मुलांचा मग्रुरीपणा जवाबदार आहेत.महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमी चर्चा सुरु असते कि,नादाला लागणाऱ्यांचा बाजार उठवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसत नाहीत.सचिन देशमुख यांची विशेष टीप : ऊध्दवजी 'वाईल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत'.वाईल्ड लाइफ शूट करायचे म्हणजे फोटोग्राफरला शिकाऱ्याचे कसब अंगी बाणवावे लागते...!  यासाठी लागणारा संयम,सावज टप्प्यात येईस्तोवर शांतपणे बसून रहाणे,सावजाला आपली चाहूलही लागू न देणे आणि शेवटी योग्य अँगल साधून सावज टिपणे यात ऊध्दवजी एक्सपर्ट आहेत.त्यामुळे ते अधुनमधून अश्या जंगली श्वापदांना टिपून त्यांचे ब्राँडकास्टींग करतच असतात.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध