Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मोठी बातमी : राज्यातील पोलीस दलात लवकरच 50 हजार पदे भरणार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्वाची घोषणा..!
मोठी बातमी : राज्यातील पोलीस दलात लवकरच 50 हजार पदे भरणार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्वाची घोषणा..!
मुंबई । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यातील युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली.“पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगीतले.मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले.
या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा
साधण्यात आला.अमरावती हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान शेवटच्या दिवशी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील पार पडलेल्या चर्चेवेळी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली.
सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 हजार 200 पदांची भरती सुरू आहे.दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे.राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात निर्णय घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा