Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

ब्रेकिंग न्यूज मनमाडजवळ किसान एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले..!



किसान एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे.मनमाडपासून अवघ्या दोन किमी अंतरावर हा अपघात झाला आहे.ही एक्स्प्रेस पुणे येथून दानापूरकडे जात असताना मनमाडजवळ रुळावरून खाली घसरल्याने अपघात झाला.गाडीचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.


याबाबत माहिती मिळताच तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू केले. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध