Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मद्रास हायकोर्टाचा निर्णय व्हॉट्सअप ग्रूप: एडमिनला दिलासा, आक्षेपार्ह मेसेजची जबाबदारी मेंबरचीच
मद्रास हायकोर्टाचा निर्णय व्हॉट्सअप ग्रूप: एडमिनला दिलासा, आक्षेपार्ह मेसेजची जबाबदारी मेंबरचीच
व्हॉट्सअप ग्रुपवर (Whatsapp Group) करण्यात आलेल्या आक्षेपार्ह मेसेजसाठी (Objectionable messages) ग्रुप अॅडमिनला (Group Admin) थेट जबाबदार धरता येणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हाच निकाल दिला होता. तोच निर्णय मद्रास हायकोर्टानेही कायम ठेवला आहे. त्यामुळे आपल्या ग्रुप मेंबर्सकडून करण्यात येणाऱ्या मेसेजेसबाबत सतत चिंता करणाऱ्या लाखो अॅडमिन्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
*मदुराईतील बँच करूर लॉयर्स नावाच्या एका ग्रुपनं याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यात ग्रुप अॅडमिनवर लावण्यात आलेले आरोप रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. ग्रुपमधील एखाद्या सदस्याने केलेला मेसेज जो अनेकांच्या भावना भडकावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, त्याचा संबंध थेट ग्रुप ऍडमिशनशी लावून त्याला दोषी धरता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे.
अॅडमिनचा सहभाग असेल तरच कारवाई : एखादी व्यक्ती जेव्हा अॅडमिन म्हणून ग्रुप तयार करते, तेव्हा त्यातील सदस्य भविष्यात त्यावर काय मेसेज पोस्ट करतील, याची पूर्वकल्पना त्याला असू शकत नाही. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याने ग्रुप अॅडमिनसोबत कट रचून जर ती पोस्ट टाकल्याचे सिद्ध होत असेल, तरच अॅडमिनला दोषी धरण्यात येऊ शकते. मात्र सामान्यतः तो केवळ एका ग्रुपचा अॅडमिन आहे, या कारणासाठी त्याला प्रत्येक सदस्याने टाकलेल्या पोस्टसाठी जबाबदार धरता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. हा निर्णय देताना न्यायालयानं किशोर विरुद्ध राज्य सरकार (2021) या खटल्याचा संदर्भ दिला. ग्रुप सदस्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पोस्टसाठी अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असं या निकालात स्पष्टपणे म्हटलं होतं. ग्रुप अॅडमिनकडे असणारे अधिकार मर्यादित असतात. एखाद्या सदस्याने केलेली पोस्ट एडिट करणे, थांबवणे किंवा सेन्सॉर करणे यांचे हे अधिकारही अॅडमिनकडे नसल्यामुळे त्याला दोषी धरण्यात येऊ नये, असं कोर्टानं म्हटलं आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव
तरुण
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री ह भ प गोपाळ महाराज दापोरीकर यांचा कीर्तनाचा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा