Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , कानळदा येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न




जळगाव प्रतिनिधी- योगेश भोई  
ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत  रांगोळी स्पर्धा व जनजागृती रॅली घेण्यात आली. इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुला मुलींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन रंगोळीमधून जनजागृतीवर आधारित संदेश दिलेत. तसेच N.C.C. विभाग स्काऊट गाईड विभागाअंतर्गत  जनजागृती रॅली घेण्यात आली.विद्यार्थ्यांच्या हातातील घोषणा फलक गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.स्वच्छता हीच सेवा या  उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक मुक्त अभियान प्लास्टिक संकलनात विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या पिशव्या, प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तू जमा केल्या.
 या प्रसंगी मतदानाची गोपनीयता , प्रसिद्धी,मतदानाची प्रक्रिया व मतदानाचे विविध टप्पे आदींबाबत जनजागृती केली. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .के . पी.चव्हाण सर,उपमुख्याध्यापक श्री.के.एम.विसावे सर यांचे मार्गदर्शन लाभले.श्रीमती व्ही.जे.पवार , क्रीडाशिक्षक आर.एन.पाटील , श्री.आर.व्ही.पाटील यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध